[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

कर्जत/ महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कर्जत जामखेड मतदार संघात बिनसले असून काल राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला
कर्जत जामखेडकर राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मतदार संघात केलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम काल अजितदादांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही निमंत्रण होते मात्र सेनेचे मंत्री अब्दुल सत्तर कार्यक्रमाला येताच त्यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गराडा घालून या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेनेच्या कोणत्याही स्थानिक नेत्याला विश्वासात घेऊन कार्यक्रम करीत नाहीत त्यामुळे आम्ही रोहित पवारांचं आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालीत असल्याचे सांगितले ,यावेळी अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांची समजूत कली आणि कार्यक्रमात हजेरी लावून भाषणही केले तसेच शिवसेनेची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली

error: Content is protected !!