मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात बदल्या होऊ शकतात तर आपले काय अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांना वाटत आहे .जे पूर्वी काँग्रेस किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले आहे तसा प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीतही घडू शकतो कारण पालिकेतील काही बडे अधिकारी बऱ्याच वर्षापासून सेटिंग करून मलईदार खात्यातील आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यांची ही उचलबांगडी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.त्यामुळे हे अधिकारी हवालदिल झाले असून आता आपल्या गॉडफादर मार्फत आपली बदली रोखण्याच्या हालचाली करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
Similar Posts
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार
पुणे/राष्ट्रवादीतील फुटी नंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले मात्र आता राष्ट्रवादीचे मावळचे खासदार अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याने पवारांना आणखी एक मोठा धक्का बसलाय अमोल कोल्हे हे मावळ मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते लोकसभेतील त्यांचे काम अत्यंत चांगले होते लोकसभेतील त्यांची भाषणे ही चांगली गाजली त्यामुळे शरद पवार त्यांच्यावर खुश होते परंतु…
गणेशविसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम तलावात – कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले
.मुंबई – २०२० नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांवर निर्बंध लादले. पीओपीच्या गणेश मूर्ती बनवणे, विकणे व वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली. जेणेकरून जलप्रदूषण होऊ नये. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलवरही बंदी घालण्यात आली. त्याऐवजी चिकणमातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आदेश देण्यात आले. पॉप लवकर विरघळत नाही त्या ऐवजी चिकन माती…
भायखळा परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन
मुंबई- महापालिका ई प्रभाग तर्फे विशेष स्वच्छता मोहीम यांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमे अंतर्गत भायखळा, माझगाव, सातरस्ता मधील मार्केट ,स्टेशन, शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. सोबत परिसरातील जनतेचे प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेस पालिका उपायुक्त संगीता हसनाळे आणि सहाय्यक आयुक्त सुरेश सागर यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आले. यामध्ये पालिका घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता…
भाजपा शिंदे गटातील झगडा दिल्ली दरबारी- महायुतीतील वाद सुरूच
नवी दिल्ली/महायुतीत भाजपानी शिंदे गट यांच्यात जो तणाव सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला भाजपा पक्ष श्रेष्ठींना भेटण्यासाठी गेलेले असतानाच मुंबईत अजितदादानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे.या भेटीगाठी म्हणजे महायुतीतील बाबानाव असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा…
गांधी आणि मनुवादी!
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून…
पोलीस असल्याची बतवाणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक
मुंबई पोलीस असल्याची बतवाणी करून एका अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार करणाऱ्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे.विष्णु सुभाष भांडेकर (वय २५) व आशिष प्रकाशचंद गुप्ता (वय ३२)अशी अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावे आहेत.शुक्रवारी दुपारी ३.३०च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ पश्चिम येथे दोन अनोळखी आरोपीनी फिर्यादीला पोलीस असल्याची धमकी दिली आणि…
