युती आघाडीच नंतर बघू अगोदर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
अंबरनाथ/मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. निवडणुकीआधीच मतदार याद्यांवर काम सुरू करा, बोगस मतदारांची नावे शोधा, बीएलओशीं संवाद ठेवा. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत, वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, याबाबत बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. जे सोडून गेले ते आपले नव्हते, असंही राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.त्यामुळे नव्या उत्साहाने कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी अंबरनाथ आणि कल्याणमध्ये सांगितले.अंबरनाथ येथील मनसे पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी कामाला लागण्याचा आदेश दिला. निवडणुकीच्या कामाला लागा. युती, आघाडी की बाकी काय करायचं ते नंतर सांगतो. मनसेची आपली ताकद आहे. ती आणखी बळकट कर. निवडणूक याद्यांवर आहे काम करा.. बूथ टू बूथ माणसे निवडा. त्यावर काम करा, मतदार याद्या वारंवार चाळा, अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.अंबरनाथमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी अंबरनाथ येथील मनसे विद्यार्थी सेना शाखेवर सर्वात आधी राज ठाकरे यांनी भेट दिली. राज ठाकरे यांनी कार्यालयाची पाहणी केली आणि त्यांनी शाखेच्या मस्टरवर सही करत ठाकरे स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांची स्वाक्षरी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
