[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबई, दि. २ :-  माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी पुढे पंतप्रधान म्हणून कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीतून त्यांनी प्रखर राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून यांनाही. ‘जय जवान, जय किसान’ घोषणेतून त्यांनी चैतन्य निर्माण केले. भारतमातेचे महान सुपुत्र माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन.

error: Content is protected !!