मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मालवाहतूक विमान निर्मितीचा एक प्रकल्प उभा राहणार होता आणि तो नागपूर मधील मिहान मध्ये होणार होता .पण नंतर हा प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे होणार आहे आणि 30ऑक्टोबरला त्याचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता फोस्कोन प्रकल्प सुधा गुजरातला पळविण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पळविण्यात आला .त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजपने मात्र महाविकास आघाडीकडे बोट दाखवत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र हा प्रकल्प गुजरातला जण्या ऐवजी महाराष्ट्रात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला
Similar Posts
राजावाडी व भाभा रुग्णालयात मनमानी पद्धतीने कंत्राटी कामगार भरती ?
मुंबई- मुंबई महापालिका खर्च कमी करण्याकरिता विविध विभागातील कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करते. पण या कंत्राटाच्या सुधा निविदा काढल्या जातात त्यासाठी कामाचे निकष, वेतन आणि इतर बाबी बाबत कंत्राटदाराकडून हमी घेतली जाते , मात्र पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालय कुरला आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोन रुग्णालयांची जबाबदारी डीन.विद्या ठाकूर या वैद्यकीय अधीक्षकांकडे असल्याने …
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
बीएमसीचे मोठे पाऊल: मुंबईतील व्यावसायिक स्पोर्ट्स टर्फसाठी पहिल्यांदाच आले नवीन धोरण, आता द्यावा लागणार ‘लायसन्स फी’
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मालकीच्या आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडांवर दिवसेंदिवस व्यावसायिक स्पोर्ट्स टर्फची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांसाठी तयार करण्यात आलेल्या या टर्फवर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीस आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या नियमनासाठी बीएमसीने प्रथमच एक सर्वसमावेशक धोरण तयार केले आहे.काय आहे नवीन धोरणाचा उद्देश?महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते की, पालिकेच्या…
राज्य सहकारी संघ निवडणूकीत-सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व
दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी मुंबई – १०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार…
मालवणमध्ये शिवरायांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळला – शिवभक्तांमध्ये संतापाची लाट कारवाईची मागणी
.मालवण – काही महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मालवणच्या राजकोट किल्ल्याजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळला . या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा पुतळा नेव्हीने उभारला होता असे सांगून महाराष्ट्र सरकारने यातून आपले हात झटकले आहेत. दरम्यान हा पुतळा तात्काळ उभारण्याचे काम हाती घेण्यात…
बीड मध्ये सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले- हत्या की आत्महत्या?
बीड/ मैत्रिणीच्या वाढ दिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येने बीड हादरले असून या आत्महत्येची पोलीस चौकशी करीत आहेत कारण ही अत्यंत गंभीर घटना आहे बीडच्या फ्लावर्स काँटर भागात राहणारे अल्ताफ शेख यांनी आपल्या दोन मुली सानिया आणि नीता यांना त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे सकाळी मोरेवाडीतील यशवंतराव चव्हाण चौकात सोडले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वाराती…
