मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका .अन्यथा तसे झाल्यास त्यांच्या असंतोषाचा भडका उढेल आणि प्रकरण अधिकच चिघळत जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे .त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी
सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत तर काही नेत्यांची चौकशी होऊन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांचीही इडी कडून चौकशी झाली आहे.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी साखर खात्यातील शेतकऱ्यांच्या नावावर…
जरांगे पाटील यांना सरकारची सुरक्षा मिळणार
मुंबई -मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा लावून धरला आहे. काही आठवड्यांपूर्वी जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहेमराठा…
इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलचा शुभारंभ – गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार
नवी दिल्ली – देशातील सीबीआयने इंटरपोलच्या धर्तीवर सुरु केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या ‘भारतपोल’ पोर्टलमुळे राज्य पोलीस दले आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीना इंटरपोलच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा…
पालिका निवडणूक लांबणीवर
महाराष्ट्रात सध्या जे राजकीय संकट उद्भवले आहे ते पाहता पालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहेमहाराष्ट्रातील मुंबईसह 14 महानगर पालिकांच्या कार्यकाळ संपलेला . त्यामुळे तिथे निवडणुका होणे अपेक्षित आहे पण काहींना काही कारणांवरून निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत आता बहुतेक महापालिकांच्या प्रभाग रचना पूर्ण झालेल्या आहेत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक ती तयारी पूर्ण झालेली आहे .पण एकनाथ…
त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ
मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं करणार आहोत असे विधान राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केले होते त्यावर बोलताना एका शहराचं नाव काय बदलतात अख्ख्या देशाचाच नाव बदलून टाका अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते केली होती त्यांच्या या प्रतिक्रियेवर देशभर संतापाची…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसत्तापदापेक्षा संघटनाविस्तारात रमणारा भाई…
ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण, हा. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र अनुसरत सत्तापदापेक्षा संघटना विस्तारात मनस्वी आनंद मानणारे भाईम्हणजे नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे हे होय. कडवट शिवसैनिकांच्या फळीतून पुढे आलेले नेतृत्व संघटना हेच आपला श्वास आणि प्राण मानते. ठाणे शहरातील शिवसेना शाखाप्रमुख ते नगरसेवक, सभागृह नेता, आमदार, अल्पकालीन विरोधी पक्षनेता आणि दोन टर्म मंत्री…
