मुंबई-क्रुझ वरील रेव्ह परीवरील रेड संशयाच्या भोवऱ्यात सापडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांची चौकशीही झाली मात्र एन सी बी ची कारवाई थांबली नाही काल एन सी बी ने मुंबई विमानतळावर ७०० ग्राम ड्रग जप्त केली ज्यांची किंमत ४कोटी आहे इतर नॅशनल कुरिअर टर्मिनल सहर कार्गो कॉम्प्लेक्स येथून ७०० ग्राम ड्रग जप्त केले या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे तत्पूर्वी २नोव्हेंबर रोजी विले पार्ले येथून जवळपास २५ कोटींचे ड्रग जप्त करण्यात आले होते याचा अर्थ समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतरही एन सी बी ची कारवाई थांबलेली नाही
Similar Posts
दोन आठवड्यात पालिका निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
दिल्ली/ महाराष्ट्रात सध्या राजकीय भोंग्याच कर्णकर्कश गोंगाट सुरू असतानाच तिकडे सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश देऊन निवडणुकीचा भोंगा वाजवल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्नात असलेल्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेतसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्यापासून महाराष्ट्र सरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे तर ओबीसी आरक्षण शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको…
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज – बलाढ्य 12 संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई, दि. ५ (क्री.प्र.)- एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत….
नाशिकमध्ये दांडिया दरम्यान शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू
नाशिक – नवत्रोत्सवात दांडिया नृत्याची मोठी धूम असते . मात्र नाशिक येथील आडगाव परिसरात दांडिया दरम्यान एका डीजे ऑपरेटरला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने येथील नवरात्रोत्सवाला गालबोट लागले असून लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील जय जनार्दन फौंडेशन या मंडळाच्या…
आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा निषेध
मुंबई : माय महानगरचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या…
आदित्य ठाकरे यांचे वरळी मतदार संघात संपर्क अभियान सुरू
मुंबई/ शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेतले अनेक नेत्या आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत त्यामुळे ही पडझड थांबवण्यासाठी आता ठाकरे गटाचे नेते आपल्या उरलेल्या पदाधिकाऱ्यांना भेटून गळती थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत .वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सध्या या मतदारसंघात आदित्य ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत…
