मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायची आणि दुसरीकडे पेट्रोल डीझेलवर उधळपट्टी करायची हे पालिकेचे काहीसे विचित्र धोरण म्हणावे लागेल .पालिकेच्या ताब्यात सध्या 966 वाहने आहेत त्यात पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वर चालणार्या वाहनांचा समावेश आहे .आणि याच ताफ्यात 5 इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला त्यातील एक वाहन महापौरांच्या ताफ्यात आहे टाटा नेकसोन इव्ही एक्स्जेड्प्लसया मॉडलच्या पाच ही कार या क्ंद्रच्या अखत्यारीतील एनर्जी एफिश्येंसी सर्व्हिसेस य कंपनिकडून ड्रायलीज पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत .मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी यापुढे अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासन सांगते . मग पेट्रोल डिझेल च्या वाहन खरेदीवर उधळपट्टी का?
Similar Posts
माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस
मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या…
औरंगाबाद , उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची मंजुरी
दिल्ली- माविआ सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान…
यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची…
राणीबाग खुली होणार
भायखळा – मुंबईकराचे आकर्षक पर्यटन स्थळ वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय लवकरच पर्यटनासाठी उघडणार आहे. .वाघ बिबळ्या अस्वल पेंग्विन वन्यप्राण्यांना पाहण्याची संधी नव्याने पाहावयास मिळणार आहे .राणीबागेत नियम पालन सक्तीचे पर्यटकांना प्रवेश देताना करोनाचे सर्व नियम पाळणे याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे डॉक्टर संजय त्रिपाठी संचालक यांनी सांगितले. कोट्ययावधि रुपये खर्चून नवे वन्यप्राण्यांना…
तडकाफडकी बदली नाटयाला … राजकीय कुरघोडीची किनार
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सहायक अभिंयता चंदन डोंगरे याचा बदली आदेश सोमवार दिंनाक 6/4/2021 रोजी दुपारी आला आणि त्याच दिवशी सध्यांकाळी त्यानी आपला पदभार प्रभागाच्या आयुक्तांकडे सोपवून संध्याकाळी ई प्रभागातून निघून गेले. दुसर्या दिवशी घाटकोपर येथील आपरेशन विभागातील पदावर रूजू झाले. या तडकाफडकी बदली नाटयामुळे ई प्रभाग घनकचरा विभागात प्रंचड खळबळ माजली. प्रभागातील दुय्यम अभिंयता, जे.ओ,…
पालिका बी विभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोहंमद अली रोडचे रस्ते चारचाकी फेरीवाल्यांनी बळकावले- अतिक्रमण निर्मूलन खाते झोपत ?
मुंबई/ सध्या मुंबईत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले असून मोहंमद अली रोड परिसर अगदी क्रॉफर्ड मार्केट पर्यंतच्या फूटपाथवर -रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. काही फेरीवाल्यांनी तर रस्त्यावरच दुकाने थाटली असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे फेरीवाल्यांमुळे चार चाकी वाहनाच्या वाहतुकीला मोठा अडथळा होतो परिणामी ट्रॅफिक जाम होते या फेरीवाल्यांमुळे पालिका बी अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांना हप्ते…
