ठाणे – रस्त्यावरील खड्डे हे पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे पाप आहे पण यावेळी लोकांनी आवाज उठवतच अनेकांचे बळी घेणार्या भिवंडी पढघा रस्त्यावरच्या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाहणी करावी लागली आणि या प्रकरणी ठाणे पालिका प्रशाशनातील 4 अभियंताना निलंबित करण्यात आले तर ठेकेदाराणाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . ठाण्यात जशी कारवाई झाली तशी मुंबईत का नाही असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत ? मुंबईच्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि ते खड्डे भरण्यासाठी पालिकेला पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय यात पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चांदी होतेय .सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कधी तरी मुंबईच्या रस्त्यांकडेही पाहावे कारण रस्त्याचे निकृष्ट काम करून मुंबई महापालिकेला चुना लावणारे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे काही सरकारचे जावई नाहीत मग त्यांना कशासाठी सरकार अभय देते .एकदा त्यांचीहि चौकशी सरकारने सुरू करावी आणी .त्यांच्यावरी कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .
Similar Posts
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्ष नेतेही आग्रही
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबईयशवंत जाधव ,महाडेश्वर ‘ अमेय घोले ; रवी राजा ‘ प्रभाकर शिंदे यांचे वार्ड महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहीर
मुंबई – आज मुंबई महानगर पालिकेसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली . ओबीसी आरक्षणाशिवाय होणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. ज्यांचे वार्ड महिलांसाठी राखीव झालेत त्यांच्यात शिवसेनेचे यशवंत जाधव , माजी महापौर महाडेश्वर , आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे यांचे खासम्खास अमेय घोले…
ना कोरोनाची भीती ,ना सरकारच्या नियमांची पर्वा, मोठ्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर
मुंबई/ आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दीन आहे.त्यामुळे कोरोणाची भीती न बाळगता तसेच सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता बाबासाहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक तसेच महिला चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून महापरिनिर्वान दीन शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या…
यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची…
लसीचे दोन डोस घेऊनही त्यांना कोरोनाणें गाठले के ई एम च्या २२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर मोठ्या प्रमाणावर मोफत लसीकरण मोहीम राबवली जात आहे मात्र लसीचे दोन डोस घेऊनही के ई एम मधल्या २२वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या घटनेनंतर सरकारची चिंता वाढली असून मास्क वापरण्या बाबत कुणीही हलगर्जीपणा करू नये तसेच सरकारने जी…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
