उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता.यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली.त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्ह्याया थोरात, गुन्हे प्रकटीकरण हर्षल राजपूत,निलेश तायडे, रोहितदास बुधवंत, हरिश्चंद्र घाणे,पांडुरंग पथवे,समीर गायकवाड,गणेश राठोड, वैजीनाथ राख,कृपाल रोकडे,हनुमंत सानप,मंगेश वीर यांनी कामगिरी केली आहे.
Similar Posts
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
विध्यर्थिनीला अश्लील क्लिप दाखवून विनयभंग करणार्या शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास
: मुंबई – विद्या देवीच्या मंदिरात ज्ञानाने पवित्र करणारा शिक्षक हा तर समजाच्या नजरेत देवदूत असतो पण आजकाल या देवदूतामध्ये राक्षस दिसू लागलाय . २०१६ मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप दाखवून तिचा विनयभंग करण्याची संतापजनक घटना मुंबईत घडली होती . मुलीने तो प्रकार घरी सांगताच तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर…
दाऊद पुन्हा भारतात मोठ्या घातपाताचा तयारीत ?
मुंबई/ सध्या पाकिस्तानात लपून बसलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणण्याच्या हालचालींना एन आय ए कडून वेग आला आहे तसेच दाऊदचे भारतातील फायनान्सर तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याने दाऊद चिडला असून त्याने भारतात पुन्हा भयंकर दहशत मजवण्याचा कट रचला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांनी मिळाली आहे. त्या नुसार भारतात बॉम्ब स्फोट करण्यासाठी त्याने एक स्पेशल…
छत्रपती संभाजीनगर’ नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे- कुटूंबियांना मारहाण
औरंगाबाद – जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजरी देण्यात आली. बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ही घटना घडली आहे. रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर नावाचे व्हाट्सअप स्टेटस आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवले होते. हे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गायकवाड यांच्या घरावर ओळखीच्या 13…
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव
नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की पोलीसदल आजही या दोन्ही ठिकाणी हा वारसा जपला जातोय.आणि महाराष्ट्रातील अनेक शूरवीर लष्कर आणि पोलीस दलात शौर्य गाजवत आहेत .पोलीस दलातील अशाच ७४ शुर विराना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले यात ४पोलीस अधिकाऱ्यांना…
धक्कादायक! अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंदरच्या विरोधात साक्ष देणार
मुंबई – अश्लील व्हिडीओ तयार केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला राज कुंदरा याच्या विरोधात आता त्याची अभिनेत्री पत्नीच साक्षीदार बनल्याने राजच्या गळ्या भोवतीचा फास अधिकच घट्ट आवळला गेला आहे . शिल्पा शेट्टी हिच्यासह 43 साक्षीदार आहेत या प्रकरणात पोलिसांनी 1467 पानाचे आरोपपत्र बनवले असून त्यात साक्षीदारांसह हजारो ईमेल वॉटसअप चॅट अदीचा समावेश आहे . शिल्पा…
