[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गणेश भक्तांना खुश खबर पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू तर मुंबई गोवा महा मार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री


मुंबई/ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात.त्यांच्या प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत करोना मुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दिवा ‘मडगाव,दिवा रत्नागिरी,मुंबई सावंतवाडी, आदी पॅसेंजर गाड्या ७ सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार फेस्टिवल स्पेशल म्हणून कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या धावणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांचा गणेशोत्सवातील प्रवास सुकर होणार आहे तर दुसरीकडे एस टी बसणे आणि खाजगी गाड्याने सुधा मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त कोकणात जातात त्यामुळे या गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महा मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे .

error: Content is protected !!