मुंबई / मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती झालेली आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार की फक्त भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान मुंबई/अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात ली आहे.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीच्या मेराज सिद्दीकी यांनी पक्ष मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये ताकदीनं निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. समाजवादी पार्टीकडून लवकरच इतर वॉर्डमधील उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत.
वार्ड २०/ मोहम्मद अझरुद्दीन सिद्दिकी, वॉर्ड 64 – डॉ. शीला अखिलेश यादव,वार्ड९०– सना अब्बास कुरैशी, वार्ड ९६– सुभाष शेख शब्बीर,वॉर्ड १३४ – शायर शाहबाज खान आझमी,वॉर्ड १३५ – शहबाज सबीर शेख,वॉर्ड 136 – रुबाबा नाजीन सिद्दीकी,वॉर्ड १३७– अहद युनूस कुरेश,वॉर्ड १४० – आप्पाती विद्यासागर डाव,वॉर्ड १४१– जायद इमरानुल्ला कुरेशी,वॉर्ड १४२ – ज्योती लक्ष्मण गुडे,वॉर्ड १४३ – आयेशा रहमतुल्ला सरदार,वॉर्ड १४८ – साक्षी सुनीलकुमार यादव,
वॉर्ड १७४ – डॉ. आरामा ठाकूर,
वॉर्ड १८१ – मोहम्मद आदिल
१६वॉर्ड १८८– गौस मोहिउद्दीन लतीफ खान, वॉर्ड २०१– इरफान साजिद अहमद सिद्दीकी,वॉर्ड २१२अमरीन शहज़ाद अब्दुल्ला
वॉर्ड २१३ – डोमिनिक मलिक
वॉर्ड २२० – गुलाम मखदूरी
वॉर्ड २२४ – रुखसाना जाफर टीमवाला
मुंबई महापालिकेच्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर केली आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असणार की नाही हे देखील स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे

