[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ३१ हजार रुपये बोनस


मुंबई : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, गुरुवार १६ ऑक्टोबर २०२५रोजी दीपावली २०२५ निमित्त कर्मचाऱ्यांसाठी घसघशीत बोनस जाहीर केला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तब्बल ३१००० रुपये बोनस मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केल्यानुसार विविध श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी ३१००० रुपये बोनस देण्यात येणार आहे.महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीअनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक,माध्यमिक शाळेतील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी ,अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) आदींचा यात समावेश आहे.तसेच सामाजिक आरोग्य स्वयंसेविकाना १४००० रुपये भाऊबीज भेट, बालवाडी शिक्षिका / मदतनीसाना ५०००रुपये भाऊबीज भेट मिळणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि शिक्षकांना सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. दिवाळीच्या खेरदीसाठी, घरगुती खर्चासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी हा पैसा उपयुक्त ठरणार आहे. कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाचं स्वागत करत ‘ही दिवाळी खास बनवणारा निर्णय’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

error: Content is protected !!