दिल्ली/ दिशा सलीयान ही नशेमध्ये होती आणि त्यातच तिचा तोल गेला आणि ती 14 माळ्यावरून पडली असा अहवाल सीबीआयने दिला आहे . त्यामुळे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेणाऱ्या नारायण राणे पिता पुत्रांना मोठा दणका बसला आहे .
सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या नंतर त्याची मॅनेजर असलेली दिशा सलियन हीचा एका पार्टी चां वेळी 14 व्या माळ्यावरून खाली पडून अपघाती मृत्यू झाला होता . दरम्यान त्या दिवशी आदित्य ठाकरे हे सुधा तेथे होते आणि यात त्यांचाही हात असावा असा आरोप राणे पिता पुत्र करीत होते .मात्र सीबीआयचा अहवाल नंतर आदित्यला क्लिनचीट तर राणेंना मोठा दणका बसला आहे .
