मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे . त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचाही शोध घ्यायला हवा असे सांगितले राज्यपाल निष्पक्ष असावा राज्यात काही पेचप्रसंग आला तर त्याची सोडवणूक त्यांनी करविपण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटले आहेत त्यामुळे आता ते जे काही बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले .
Similar Posts
राज्यांच्या अधिकार क्षेत्रावर तुमचे अतिक्रमण का?सरन्यायाधीशनी ईडीला फटकारले
नवी दिल्ली/तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन टेस् मॅक मधील ₹1000 कोटींच्या घोटाळा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने प्रवर्तन संचालनालयाला तीव्र शब्दांत फटकारले. मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ईडीला थेट प्रश्न केला की, “जेव्हा राज्यातील पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकतात, तर ईडीने हस्तक्षेप करण्याची गरज काय होती? हा राज्याच्या अधिकारक्षेत्रावर अतिक्रमण नाही का?”सीजेआय गवई…
अनिल माधव जोशी, आम्हाला माफ करा !
मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पटू पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. सर्वच पुरस्कार सन्मानित पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! बऱ्याच वर्षांपासून हे पुरस्कार देण्याचे राहून गेले होते ते संघाचे प्रथितयश कर्णधार संदिप चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या समितीने एका झटक्यात प्रदान…
ए सी लोकल अर्थात पांढरा हत्तीवर प्रवाशांची दगडफेक
मुंबई-एसी लोकलचे प्रवासी भाडे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातच या लोकलमुळे सामान्य लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे त्यांच्या संतापाचा फटका एसी लोकलला बसत आहे. यातून झालेल्या दगडफेकीत एसी लोकलच्या काचा फुटून नुकसान होत आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.मध्य रेल्वेवर सध्या ६० एसी लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातात. काही दिवसांपूर्वीच ठाणे-दिवा ५ व्या…
दिल्ली – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ४० स्टार प्रचारकांची यादी ! फडणवीस , गडकरींचा समावेश
नागपूर : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर फडणवीस आणि गडकरी दिल्ली विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरणार…
माथाडी कामगारांचा निषेधार्थ – लक्षाणिक संप
नवी मुंबई दि. 30 : – माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ दि.01 फेब्रुवारी,2023 रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संप पुकारला असल्याचे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे…
मोब लिंचिंग करणार्यांना यापुढे फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : इंग्रजांच्या काळापासून अद्यापर्यंत सुरु असलेले तिन्ही फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, नवं क्रिमिनल लॉ विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं, त्याला मंजुरीही मिळाली. या कायद्यांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये मॉब लिचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षेच्या तरतुद करण्यात आली आहे. तर ‘कलम १२४ अ’ अंतर्गत आता राजद्रोहाऐवजी…
