नवी दिल्ली/राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटाच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. दहशतलादी डॉ. उमर याने केलेल्या आत्मघातकी कार स्फोटात त्याच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला तर २० लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकू काही जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणाकडून कसून तपास सुरू असून अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अनेक महत्वाचे खुलासे झाले, बरीच धक्कादाायक माहितीदेखील उघड झाली. एमआयए सध्या स्फोटाच्या तपासात गुंतली आहे. दरम्यान, एक मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी दहशतवादी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांच्यात मोठा वाद झाला. पैशांच्या मुद्यावरून हा वाद झाल्याचे समजते डॉक्टर मुझम्मिल याने मॉड्यूलसमोर 2 अटी ठेवल्या होत्या. पैसे परत करा किंवा सर्व सामान तिथेच ठेवू, अशा त्या अटी होत्या. अखेर मॉड्यूलने दुसरा पर्या निवडला आणि सर्व सामान मुझम्मिल याच्याकडेच ठेवलं, पण ९ नोव्हेंबरला अटक झाल्यावर मुझम्मिलच्या माहितीवरून ते सामान जप्त करण्यात आलं. वाद सोडवण्यासाठी उमरने सिग्नल ॲपवर एक गट तयार केला. त्याने आदिल, मुफर आणि इरफानसह डॉ. मुझम्मिलला त्यात ॲड केलं, पण वाद काही सुटला नाही.याचे समजते.दहशतवादी मुझम्मिलने तपास यंत्रणेसमोर कबूल केले की त्याने २०२३ मध्ये दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. तो दोन वर्षांपासून या स्फोटासाठी स्फोटकांची व्यवस्था करत होता. अमोनियम नायट्रेट आणि युरिया मिळवण्याची जबाबदारी मुझम्मिल याच्यावर होती. याच मुझम्मिलने गुरुग्राममधून २६ क्विंटल एनपीके खत खरेदी केले होते.
नंतर या खताचे स्फोटकांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी डॉ. उमर मोहम्मद याच्यावर होती. स्फोटासाठी रसायने, रिमोट आणि उपकरणाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. मुझम्मिलने एनपीके खत तीन लाख रुपयांना खरेदी केले होते.
एवढंच नव्हे तर या ब्लास्टसाठी सेल्फ फंडिंग करण्यात आलं होतं, असा खुलासाही तपासात झाला. डॉ. मुझम्मिल याने ५ लाख रुपये, डॉ. आदिल अहमद राथेरने ८ लाथ, डॉ. मुफ्फर अहमद राथेर याने ६ लाख रुपये दिले होते. तर डॉ. उमरने २ लाख रुपये आणि डॉ. शाहीना शाहिद हिने ५लाख रुपये दिले होते. एकूण २६ लाख रुपयांची कॅश अर्थात रोख रक्कम जमा करून ते पैसे डॉ. उमरला देण्यात आले होते.

