दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस ठाण्यातच भीषण स्फोट! ७ पोलिसांसह ९ ठार ३० जखमी
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. यामध्ये ७ पोलिसांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी…
