नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुविधा पुरवण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारीच आता पैशांच्या मोहात अडकल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेवर आणि विनाअडथळा व्हावीत, अशी अपेक्षा असताना, एका अधिकाऱ्याने चक्क स्वतःच्याच खिशात पैसे घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB च्या पथकाने धडक कारवाई केली असून, २० हजार रुपये लाच स्वीकारताना एका बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. त्याचे नाव राधेश्याम जैस्वाल असे आहे. राधेश्याम जैस्वाल हे मूळचे मुंबई महानगरपालिका प्रशासनात उपअभियंता या पदावर कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्यावर पालिका प्रशासनाने विश्वास ठेवून ‘अ’ वॉर्ड येथील सहाय्यक अभियंता या अतिशय महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता.
