मुंबई: मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अस्वच्छतेमुळे बंद पडलेले कॅन्टीन अखेर प्रशासनाने पुन्हा सुरू केले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये अनेक त्रुटी व अस्वच्छता आढळून आल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने कॅन्टीन परिसराचे स्वच्छता परीक्षण करून सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता केली. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य यासंबंधी एफडीएने दिलेल्या सर्व मानकांची अंमलबजावणी करण्यात आली. एफडीएच्या पुनरतपासणीत समाधानकारक सुधारणा दिसून आल्यानंतर या कॅन्टीनला पुन्हा सुरू करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली. यामुळे पालिका मुख्यालयात येणारे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
