मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.
Similar Posts
श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा ; तब्बल २० हजारांहून अधिक नामधारकांची उपस्थिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी नुकतीच ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. याचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनने श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुग्धशर्करा योग म्हणजे हा सोहळा १० जुलै गुरु पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात…
कांद्यावरील २० टक्के निर्यात कर हटवला _ केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली/कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आले आहेत खास करून कांद्यावरील निर्यात बंदी नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते या सर्व पार्श्वभूमीवर आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहेकांद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी…
मीरा रोड पाठोपाठ मुंबईच्या महमद अली रोडवरची अतिक्रमणे हटवली
मुंबई/ मिरा रोड मधे हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेकीचे प्रकार घडल्यानंतर यात सामील असलेल्या समाज कांटकांच्या बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेने कारवाई केली होती.त्यानंतर आता मुंबईतील महमद अली मार्गावरील बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेने कारवाई सुरू केली असून तब्बल 40 अतिक्रमणे हटविण्यात आली त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे अतिक्रमण करणाऱ्यांचा आरोप आहे .तर या अनधिकृत…
फडणवीस संतापले- शिवसेनेची तालिबानशी तुलना
मुंबई/ नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेने स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण केले होते त्यावर भाजपा नेते चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी शिवसेनेची तुलना तालिबानी दहशतवाद्यांशी केली आहेफडणवीस म्हणाले की हा प्रकार ज्यांनी कुणी केला असेल त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेच नाही ही अतिशय संकुचित मानसिकता असून एक प्रकारे बुरसटलेले तालिबानी विचार आहे.अशाप्रकारे वागणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.लॉक…
युक्रेनमध्ये अडकलेल्यांना आणण्यासाठी चार मंत्री रवाना
दिल्ली/ युक्रेन रशिया युद्धात आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम तेज करण्यात आली असून या मोहिमेच्या अंतर्गत केंद्रातील चार मंत्री युक्रेनच्या शेजारील राष्ट्रात जाऊन या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.रशिया युक्रेन युद्धाचा आजचा…
