मुंबै बँक निवडणूक: ‘सहकार पॅनेल’च्या बिनविरोध हालचालींना चंद्रशेखर कानडे यांचा विरोध; सभासदांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर
मुंबई:मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक निवडणुकीत ‘बिनविरोध’ निवडीच्या नावाखाली सर्वसामान्य सभासद संस्थांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा आक्षेप लोकसेवक चंद्रशेखर कानडे यांनी नोंदवला आहे. या निवडणुकीसाठी महायुतीने ‘सहकार पॅनेल’च्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली असून, जास्तीत जास्त जागा बिनविरोध निवडून आणण्याच्या हालचालींना कानडे यांनी विरोध दर्शवला आहे.बँकेच्या २१…
