मनसे मधून तिकीट न मिळालेले संदीप देशपांडेंचे खासमखास संतोष धुरी भाजपच्या वाटेवर
मुंबई/महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रभाग क्रमांक १९४ मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक १९४ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे. यामुळं नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी काही वेळापूर्वी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली….
