जोवर कर्जमुक्ती नाही तोवर सरकारला मत नाही असे बोर्ड लावा! उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन
धाराशिव/राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना, दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ४ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही, शेतकऱ्यांना शासकीय मदत किती मिळाली, याचा आढावाच ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका…
