मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील नुतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.
या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पुन्हा वेळ मागण्यात आली. आणि त्यांनीही त्यांचे वेळापत्रक बघून वेळ देतो अशी शब्द पत्रकार संघाला दिला आहे.
ग्रीन रुम, लाईट आणि साऊंडची अद्ययावत यंत्रणा आणि रंगमंच पडदा अशा अद्ययावत सुविधांसह सुसज्ज असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील नवीन सभागृहाचे उद्घाटन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात करण्यात येणार आहे.

