वरळीत आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने दोन्ही गटांची परस्परविरोधी घोषणाबाजी
मुंबई : नारळी पोर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने मुंबईत वरळीच्या कोळीवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सर्व कोळीबांधव यावेळी समुद्राला नारळ अर्पण करतात. पूजा करतात. नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त वरळी कोळीवाड्यात आज नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पण या कार्यक्रमात राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडींमुळे काही काळासाठी कोळीवाड्यातील वातावरण…
