भायखळा: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय बैठकीत – रस्त्यांची दुरवस्था आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणचा प्रश्न गाजला
मुंबई:बृहन्मुंबई महानगरपालिका ई-वॉर्ड, बी वॉर्ड, अ वॉर्ड कार्यक्षेत्रात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली.या बैठकीत आगामी सण निर्विघ्न आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विविध नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक २०७ चे लोकसेवक चंद्रशेखर कानडे यांनी भागातील नागरी समस्या आणि मंडळांना…
