झेड पी आणि पंचायत समिती निवडणुकीतही बिनविरोधचा पॅटर्न कायम
मुंबई/महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल ११ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, भाजपचे १० आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून ५उमेदवार बिनविरोध असून ६ उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत….
