पार्थ वरील जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित दादांनी जयला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाजूला केले – पाप कुणाचे ताप कुणाला
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती. जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरु होती. पण याबाबत खात्रीशीर माहिती समजू शकत नव्हती. त्यामुळे जय पवार…
