मुंबई : सातरस्ता येथील उमर मेंशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या मॅचेसचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांचा समाजसेवक चंद्रशेखर अशोक कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना कानडे म्हणाले, “तरुणांनी सर्वप्रथम स्वतःची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी खेळ आणि व्यायामाला प्राधान्य द्यावे. मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये अडकलेला तरुण वर्ग आता मैदानावर उतरला पाहिजे. प्रभाग क्रमांक २०७ मध्ये या पोरांसाठी मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. काही मैदाने खेळण्यासाठी होती, ती आता अडवून तरुणांची गोची केली जातेय. या मुद्द्यावर लवकरच सर्व तरुणांना एकत्र करून मी प्रश्न उभा करणार आहे.”या कार्यक्रमाने स्थानिक तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, खेळाच्या माध्यमातून सामाजिक जागृती होत असल्याचे मत व्यक्त केले ज
विजयी संघ -रायगड योद्धा
लिग क्रिकेट मॅच चा आयोजन अमोल जाधव, हेमंत घाग आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

