उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षा पेक्षाही वाईट आहे.विरोधकांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास एक ना धड भाराभर चिध्या अशी विरोधकांची स्थिती आहे आणि हीच गोष्ट योगी महाराज आणि साताधरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे २०१७ क्या निवडणुकीत विरोधकांचे जे हाल झाले त्यापेक्षाही वाईट हाल यावेळी होणार आहेत.मायावतींचा एकाच जागी सुस्तवून पडलेला हत्ती आणि युपितल्या यादवा नी पंक्चर केलेली अखिलेश भय्याची सायकल यामुळे समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाजवादी पार्टी या दोघांनीही जनाधार हरवलेला आहे तर युपी मध्ये काँग्रेस असून नसल्यासारखी आहे प्रियांका गांधींनी किती जारी प्रयत्न केले तरी युपी मध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.आणि या निवडणुकीत काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी तिघेही स्वबळावर लढत असल्याने भाजप चां मार्ग मोकळा आहे म्हणून तर मुंबईतले रिक्षावाले,टॅक्सी वाले,पानपट्टी वाले सगळे भय्या लोक एका सुरात मोदी आणि योगिंचे गुणगान गात अबकी बार युपीमा दुबारा कमलवा खिली असे छाती ठोक पने सांगत आहेत.युपी मधील ३० ते ४० टक्के भय्या लोक मुंबईत काम करतात आणि या सगळ्यांना युपी मधील निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने मुंबईतले सगळे भय्या लोक गावी जायचा तयारीत आहेत. भाजपने अगोदरच त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे ही निवडणूक योगी महाराज एकहाती जिंकणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही या देशातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष हेच बलस्थान आहेे. नाहीतर योगी आणि मोदी यांनी युपी मध्ये असे काय दिवे लावलेत की त्यांच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून द्यावे? वास्तविक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा जर विरोधी पक्षाने एकजुटीने फायदा घेतला असता तर योगी महाराजांना पुन्हा कायमचे गोरखपुरचा मठाची वाट धरावी लागली असती कारण शेतकरी आंदोलन हा निवडणुकीतल्या फार मोठा मुद्दा बनला असता.पण विरोधक नालायक निघाले आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट होणार आहे तर दुसरीकडे युपितले काही देवभोले मतदार भाजपच्या बाजूने उभे राहणार आहेत. युपीतील आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता तिथे सर्व निवडणुका जाती धर्माच्या आधारावर लढवल्या जातात.आणि तिथे दलीत मुस्लिम आणि यादवांची मते निर्णायक ठरत असतात त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येवून निवडणूक लढवली असती आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असतेे. पण प्रत्येकाला स्वबळाची खमखुमी आहे त्यामुळे विरोधक यंदा अनामत रक्कम सुधा वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहेे.
Similar Posts
माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावरून संसदेत गोंधळ
नवी दिल्ली/राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेत जोरदार वादविवाद झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.राहुल गांधी यांनी एका माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचा हवाला देत चीनवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देत पुरावे देण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधी म्हणाले…
राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई/ राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून विश्वास नांगरे पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील. मिलिंद भारंंबे नवी मुंबईचे आयुक्तविशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची…
बाळासाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही- उद्धव ठाकरे
मुंबई – निवडणूक जिंकायच्या असतील तर बाळासाहेबांच्या शिवाय पर्याय नाही . हिम्मत असेल तर मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवा असे उघड आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला केले आहे. तसेच गद्दार विकत घेता येऊ शकतात पण गर्दीचे चैतन्य विकत घेता येत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईवानखेडे यांना धक्का ! आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला
मुंबई/ समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एन सी बी ने त्यांच्याकडची तपास कडून घेतला असून आता हा तपास एन सी बी चे दुसरे संचालक संजय सिंह हे करणार आहेत .समीर वानखेडे यांनी क्रुझ वरील रेव्ह पार्टी वर टाकलेल्या धाडी पासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत कारण ही धाड बनावट होती यात…
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचीएसीबी कडून साडेसहा तास चौकशी अटकेची शक्यता
राजापूर -तब्बल साडे सहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येत आहे. राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही समावेश आहे.आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका आमदार राजन साळवींनी घेतली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना -शिंदे सेना संघर्ष जारी
मुंबई/ सध्या शिवसेना आणि शिदें सेना यांच्यात जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत . आज शिवसेना कार्यकर्त्यानी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले तर ठाण्यात शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन केले . त्यामुळे रस्त्यावरचा हा संघर्ष आणखी पेटणार असून बंडखोर आमदार 30 जून पर्यंत गोहती मध्येच…
