मुंबई/ ऐन निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना आणि भाजपतील वाद शिगेला पोहचला आहे.भाजपच्या ऑपरेशन लोटासमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून वाद मिटवण्याचा कवायत सुरू झाली आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र नाही. भाजपने सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका बसू लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंनी आता एक वक्तव्य केलं. थोड्याच वेळात आम्ही एक स्फोट करणार आहोत, तो पाहा असा इशारा भरत गोगावलेंनी दिला. त्यानंतर हा स्फोट आमची नैसर्गिक युती असलेल्या पक्षाशी संबंधित नसल्याचंही गोगावलेंनी स्पष्ट केलं.
भाजपाच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच एकनाथ शिंदे वगळता सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. आम्ही आमच्या वैयक्तिक कारणास्तव बैठकीला गेलो नव्हतो, त्यामध्ये इतर कोणतीही गोष्ट नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी केलं.
मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर मंत्री भरत गोगावले म्हणाले की, चुका या दोन्हीकडून होत असतात, टाळी एका बाजूने वाजत नसते. त्यावर मुख्यमंत्री आणि आमचे नेते शिंदेसाहेब चर्चा करतील आणि मार्ग काढतील. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर कुणी कुणाला झापलं आणि चापलं असं झालं नाही. समजुतदारपणाने यामधून मार्ग काढण्यात आला. आता आम्ही थोड्या वेळाने स्फोट करणार आहोत, तो पाहा.
आमची नैसर्गिक युती असलेल्या पक्षासंबंधी हा स्फोट नसेल असंही भरत गोगावलेंनी स्पष्ट केलं. तसेच यापुढे रायगडमध्ये जशास तसं उत्तर दिलं जाणार असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना दिला.
निधीवरून महायुतीमध्ये काही वाद नाही. गेल्या वेळी आम्हाला भरभरून निधी मिळाला होता. आता नवीन जे निवडून आले आहेत त्यांना काहीसा निधी कमी पडतोय. त्यावर शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री चर्चा करली आणि मार्ग काढतील असं भरत गोगावले म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्षांकडून जाणीपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केले जात असल्याची तक्रार.
कल्याण डोंबिवलीत वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जातोय.
शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नाराज नेते यायला तयार होते, पण सेनेने ते जाणीवपूर्वक टाळले. पण ज्यांनी महायुतीविरोधात काम केलं त्यांनाही भाजपमध्ये घेतलं जात आहे.
दोस्तीत कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका, पण त्याला मित्र पक्षांकडून छेद दिला जातोय.

