मुंबई: विधान भवनात आमदार अमीन पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर जोरदार आवाज बुलंद केला. जर्नलिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अॅड. स्मिता चिपळूणकर आणि सलीम शेख यांच्याशी झालेल्या महत्त्वपूर्ण भेटीनंतर त्यांनी हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित केला.या भेटीत पत्रकार आणि प्रकाशन संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. आमदार पटेल यांनी पत्रकारांच्या या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी ठाम भूमिका घेतली.”पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत! त्यांना काम करताना कोणत्याही अनावश्यक अडचणी येऊ नयेत,” असे स्पष्टपणे सांगत त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.या घडामोडीमुळे पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आमदार पटेल यांच्या या पवित्र भूमिकेचे कौतुक होत आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठीचा हा लढा यशस्वी होईल, अशी आशा आहे!

