या देशातून इंग्रज भलेही गेले असले तरी त्यांनी फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीचा वारसा मात्र येथे ठेऊन गेलेत.त्यामुळेच भारतात फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे .आणि आजकाल राजकारणात निष्ठा, नीतिमत्ता, चारित्र्य याना कावडीचीही किंमत राहिलेली नसल्याने कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.तसेच राजकारणात सध्या सर्वच सत्तलोभी असल्याने निष्ठा वैगेरे सोडून सतेच्या मागे धावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षात फूट पाडून सत्ता मिळवली जाते.हे त्याचेच उदाहरण आहे पण जे लोक वर्षं वर्ष शिवसेनेत राहून अब्जाधीश झाले आणि आता सतेसाठी भाजप सोबत गेले ते भाजपशी तरी प्रामाणिक राहतील याची काय शाश्वती? पण त्यांच्या बंडखोरी पेक्षा त्यांना बंडखोरी करायला लावणारे लोक अधिक भयंकर आहेत.जे स्स्वार्थासाठी एखाद्या पक्षात (फूट पाडू शकतात ते स्वतःच्या फायद्यासाठी समाजात आणि देशात सुधा फूट पाधायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि शिवसेनेत फूट पडल्यावर आता त्यांचे लक्ष काँग्रेस राष्ट्रवादीवर आहे .
Similar Posts
काय आहे यूपीचे नझुल विधेयक
उत्तर प्रदेश – नझुल विधेयकावरून उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जाणून घ्या काय आहे नझुल विधेयक, ज्याला सर्वात बलाढ्य मुख्यमंत्र्यांमध्ये गणले जाणारे सीएम योगी देखील एका झटक्यात कायदेशीर करू शकले नाहीत.उत्तर प्रदेशच्या राजकारणात अलीकडच्या काळात नझूल संपत्ती आणि नझूल विधेयकाची चर्चा जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष दुभंगलेला दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर…
जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन
सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले त्या ८२ वर्षांच्या होत्या . स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ लाभली .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे स्वर्गीय सरोजिनी…
नमाजाच्या वेळेस मशिदीत बॉम्बस्फोट ८ ठार
होम्स( सीरिया)/शुक्रवारी सीरियातील होम्स शहरात नमाजच्या वेळी एका मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाला असून किमान १८जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. अलावी समुदायाच्या मशिदीत हा स्फोट झाला आहे. अलावी हा सीरियातील एक अल्पसंख्याक समुदाय आहे. सरकारी वृत्तसंस्था सनाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट होम्स शहराच्या ‘वादी अल-दहाब’ भागातील ‘इमाम अली…
मनसे कडून शिंदे गटाला दहा जागांचा प्रस्ताव
मुंबई/राज ठाकरेंची मनसे भलेही महायुतीत नसली तरी पडद्यामागून मनसे महायुती सोबतच आहे. मनसेने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानुसार आत्तापर्यंत एकशे दहा उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु मनसेची महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद पाहता मनसेचे खूप कमी लोक निवडून येतील. पण तेही महायुतीने त्या त्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा दिला तर. अशी आज परिस्थिती आहे आणि ही…
शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे योगिना खुले आव्हान
लखनौ/प्रयागराज माघ मेळा सोडल्यानंतर, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. त्यांनी वाराणसीत पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले की, “मला माझ्या शंकराचार्य दर्जाचे प्रमाणपत्र मागितले गेले होते. मी ते दिले. माझे पुरावे खरे होते, म्हणून त्यांना ते स्वीकारावे लागले. आता पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा द्यावा.” ते म्हणाले, “आम्ही…
हिमाचलच्या मंडी मध्ये किंग विरुद्ध क्वीन कंगना राणावत च्या विरोधात विक्रमादित्य
मंडी/हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा मतदार संघात भाजपाने कंगना राणावत याना तिकीट दिले आहे तर काँग्रेसने माझी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य याना मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे राज घराण्यातील असल्याने मंडी मध्ये किंग विरुद्ध kveen असा मुकाबला होणार आहे.2021 साधी झालेल्या पोटनिवडणुकी या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजय झाल्या होत्या पण जिजामाता त्याने…
