तेहरान/अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता हस्तांतर करण्यात आली आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणने वरिष्ठ धर्मगुरू अयातोल्लाह अली रेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. संविधानानुसार नव्या सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत अंतरिम नेतृत्व परिषद देशाची जबाबदारी सांभाळणार आहे.इराणच्या संविधानानुसार सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि गार्डियन कौन्सिलमधील एक धर्मगुरू यांचा समावेश असलेली परिषद तात्पुरती सत्ता सांभाळते. ही परिषद महत्त्वाचे धोरणात्मक आणि लष्करी निर्णय घेते. अंतिम निर्णय मात्र ८८ सदस्यीय ‘असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’ घेते, ज्यांच्याकडे देशाच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेवर सर्वोच्च अधिकार आहेत.६७ वर्षीय अली रेजा अराफी यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. ते सध्या असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्सचे उपाध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये ते गार्डियन कौन्सिलचे सदस्य होते. ही संस्था निवडणूक उमेदवारांची छाननी आणि संसदेत मंजूर कायद्यांचे पुनरावलोकन करते. अराफी हे देशातील इस्लामी मदरसा व्यवस्थेचे प्रमुख मानले जातात. त्यांनी अल-मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे नेतृत्वही केले असून तेथे देश-विदेशातील धर्मगुरूंना प्रशिक्षण दिले जातेखामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून या हल्ल्याचा बदला घेण्याच्या घोषणा करण्यात आली आहे.

