मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी ४,१६५ अर्जांची विक्री निवडणूक रंगतदार होणार
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५/२६ साठी, मंगळवार २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) वितरणास जोमाने सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची उत्सुकता पहिल्याच दिवशी दिसून आली असून, मुंबईतील २३निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५अर्ज नेण्यात आले आहेत. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज अधिकृतपणे दाखल झाला नाही.निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना ३० डिसेंबर २०२५ पर्यंत…
