दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष का?भाजपाचा ठाकरे बांधून सवाल
मुंबई प्रतिनिधी:राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित…
