मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी म्हणजेच कालपासून सुरु झालं आहे. आज राज्य सरकारच्यावतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ११,९९५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. तर, राज्य सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. सचिन सावंत यांनी अर्थसंकल्पीय, पावसाळी, हिवाळी अशी विधिमंडळाच्या अधिवेशनांन नावे देण्याऐवजी पुरवणी अधिवेशन असे एकच नाव द्यावे, असा सल्ला देखील महायुती सरकाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या. महसुली खात्यावरील एकूण खर्च – ५,७७८ कोटी रुपये तर भांडवली खात्यावरील खर्च ६००३ कोटी रुपये आहे. या पुरवणी मागण्यांमधील प्रमुख तरतुदी आहेत ज्यात. उद्योग क्षेत्र: ऊर्जा, कामगार, उद्योग आणि खनिकर्म विभागासाठी ४,०६६कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक३२६२ कोटी रुपये वीज क्षेत्रासाठी, तर ८०३ कोटी रुपये ग्राम आणि लघु उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. रला दिला आहे.पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी १४३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर ग्राम विकास विभागासाठी ७१कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नियोजन विभाग: ८० कोटी रुपये.अन्न व नागरी पुरवठा विभाग: ५५.५२ कोटी रुपये.ओबीसी कल्याण विभाग: २३.६४ कोटी रुपयेमहसूल आणि वन विभाग: १३२ कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग: ३१ कोटी रुपये. आदींचा समावेश आहे.

