मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६/२८ या आर्थिक वर्षासाठीचा अंदाजे ८० हजार कोटींपेक्षा जास्त आकाराचा फुगीर अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे साडेतीन वर्षांचे प्रशासक राज संपल्यानंतर प्रथमच स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना बुधवारी दुपारी 2 वाजता सादर करणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे हे सादर करतीलमुंबई शहर हे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. या शहराचा कारभार मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चालवला जातो. मुंबई महापालिकेचा सन २०२५/२६ या वर्षासाठी महापालिकेचा एकूण अर्थसंकल्प ७४४२७.४१ कोटी रुपये होता. त्यापैकी ४३,१६२ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, ३१जानेवारी २०२६ पर्यंत सुमारे १९४४३कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सन २०२१/२२ मध्ये मुंबई महापालिकेने ३५,९६२ कोटी रुपये आकारमानाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, २०२२/२३ मध्ये ४३,४९१ कोटी रुपयांचा, २०२३/२४ मध्ये ५२,५५३ कोटी रुपयांचा, २०२४/२५ मध्ये ६४,१८० कोटी रुपयांचा आणि २०२५/२६ मध्ये ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, यावेळी सन २०२६/२७ या वर्षासाठी तब्बल ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आकारमानाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यंदा मोठ्या घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. नव्या योजनांपेक्षा आर्थिक व्यवस्थापनावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत पार्किंचा विषय खूप मोठा आहे. दाटीवाटीच्या रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या विचित्रप्रकारे गाड्या पार्क केल्याने वाहतूकीमध्ये मोठा अडथळा निर्माण होणाऱ्या अरुंद गल्ल्यांमध्ये पार्किंग नियंत्रित करण्याच्या तयारीत असून लवकरच याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबईतील काळबादेवी आणि झवेरी बाजार परिसरात होलसेल बाजारपेठांमुळे दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती असते. अशा कोणताही आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका अडकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे, दक्षिण मुंबईतील चंदनवाडी गिरगाव काळबादेवी गावदेवी, ताडदेव, मुंबई सेंट्रल, नागपाडा, आग्रीपाडा आणि भायखळा परिसरात २४० हून अधिक अरुंद गल्ल्या आहेत. त्यामधील सुमारे ३५ ते ४० गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की, तिथून एकावेळी केवळ एकच वाहन जाऊ शकतं. या भागांमध्ये देखील कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. काही गल्ल्यांत सम-विषम तारखेनुसार पार्किंगची परवानगी दिली जाईल.
काही ठिकाणी पूर्ण नो पार्किंग लागू केलं जाईल. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे.
पर्यायी पार्किंगची ठोस व्यवस्था नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

