नवी दिल्ली/ ए आय समिट मध्ये विदेशी पाहुण्यांसमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे टॉपलेस आंदोलन केले त्याचा कट राहुल गांधींच्या घरातच रचला होता असा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. दरम्यान आज देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या कृत्य विरुद्ध आंदोलने केली.संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये अटक करण्यात आलेले चार तरुण हे युवक काँग्रेसचे नेते असून काँग्रेसमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.संबीत पात्रा म्हणाले, “आज जेव्हा मी इथे आलो तेव्हा माझ्या मनात प्रचंड राग होता, पण मी स्वतःला मोठ्या कष्टाने सावरले. हा आक्रोश केवळ भाजपा प्रवक्त्याचा नाही, तर संपूर्ण भारतातील ‘GenZ’ चा आहे. ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी नसून भारत विरुद्ध भारताची प्रतिमा मलीन करणाऱ्या शक्तींच्या विरोधात आहे.”
पत्रा यांनी दावा केला की, या चार जणांनी समिटमध्ये रीतसर नोंदणी करून आणि बारकोड मिळवून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपले कपडे काढून निदर्शने केली. हा सर्व कट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधींच्या निवासस्थानी रचला गेल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की, “राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे गद्दार असून शुभ कार्यात विघ्न आणणारे व्यक्ती आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ असो वा एअर स्ट्राईक, ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. काँग्रेससाठी माझ्याकडे तीन शब्द आहेत – ‘टॉपलेस, ब्रेनलेस आणि शेमलेस’. ही भाजपाची परिषद किंवा कार्यकारिणी नाही, तर भारताची ए आय समिट’ आहे. मी सर्व तरुणांना सांगेन की, मोबाईलवर नेहरू आणि एडमिना यांचे फोटो शोधा, ते भारताला सापांचा देश म्हणत होते आणि हसत होते. जे नेहरूंनी केलं तेच आज राहुल गांधी करत आहेत असाही त्यांनी आरोप केला

