२५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई/मुंबई महापालिका अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होतो. मात्र महापौर निवडणुकीसह, स्थायी समिती व अन्य समिती अध्यक्ष तसेच सदस्य निवडणूक प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. अखेर हा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नव्या स्थायी समिती अध्यक्षांसोबत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समिती सभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे….
