महाराष्ट्रात बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर कारवाईसाठी ऑटोरिक्षा संघटना आक्रमक; परिवहन मंत्र्यांकडे ७ मागण्या सादर
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने बेकायदेशीर बाईक टॅक्सी, अनधिकृत ई-रिक्षा आणि भंगार वाहनांच्या बेकायदेशीर वापरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ऑटोरिक्षा चालकांच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचे रक्षण करण्यासाठी कृती समितीने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सात-कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले.युनियन नेते शशांक राव आणि विलास भालेकर यांनी सांगितले की,…
