दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीर मध्ये जे ई आय च्या ३०० ठिकाणांवर छापे
श्रीनगर: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी जम्मू आणि काश्मिरातील दहशतवादी गटांवर कारवाई तीव्र केली असून काश्मीर खोऱ्यातील बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी (जेईआय) संबंधित ३०० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली.जेईआयशी संबंधित घटक वेगवेगळ्या आघाड्यांवर पुन्हा कारवाया सुरू करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. याआधारे हे छापे घालण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले….
