मुंबई महापालिकेच्या बोरीवली आर/मध्य सहाय्यक आयुक्त पदी प्रफुल दिनेश तांबे तर गोरेगाव पी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदावर अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक आयुक्त पदाचा भार कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण झालेल्या दोन आणखी सहायक आयुक्तांची नियुक्ती विभागांत करण्यात आली आहे. यातील प्रफुल दिनेश तांबे यांची बोरीवली आर/मध्य प्रशासकीय विभाग आणि अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी…
