स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार निवडणूक आयोगाकडून आढावा बैठक
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा…
