मुंबई, दि. (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल अशा शब्दांत आपापल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उत्तर मुंबई पत्रकार संघ आणि मागाठाणे मित्र मंडळ आयोजित आदरांजली सभांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विजय वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सरचिटणीस प्रवीण वराडकर, कोषाध्यक्ष रविंद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार, कवी, साहित्यिक विजय तारी, ज्येष्ठ पत्रकार नितीन सावंत, छायाचित्रकार संदिप टक्के यांनी विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाची इमारत बोरीवली ठाणे भूयारी मार्ग प्रकल्पात जाणार आहे. या इमारतीतील ग्रंथालय/वाचनालयासाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. यासाठी मंत्रालय पातळीवर तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार सुरु आहे. या विषयाचा उहापोह सायंकाळी मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आला. तेंव्हा हे ग्रंथालय/वाचनालय वाचविणे, टिकविणे एवढेच नव्हे तर ते वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विजय वैद्य यांचे नांव बोरीवली कडील भूयारी मार्गाला देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. विजय वैद्य यांच्या विविध आठवणींना उजाळा देऊन प्रा. नयना रेगे, विभाग संघटक शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मीता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी आदरांजली वाहिली.
Similar Posts
घाबरू नका -पंचसूत्राचे पालन करा- मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
नागपूर -जगात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला आहे त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे मात्र काळजी करण्याचे कारण नाही कारण कोरोनाचा बीएफ-७ व्हेरियंट अद्याप तरी महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या…
राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई अतिरेकी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १३ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी…
मावळ गोळीबारानंतर उत्तर प्रदेश बंद होता का?
मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का? जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका? लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून…
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे भव्य शपथविधी सोहळा संपन्न एकनाथ शिंदे, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे व अजित आशाताई अनंतराव पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राष्ट्रगीताने तसेच राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली….
१०० वी मनकी बात करताना पंतप्रधान भावुक
दिल्ली – २०१४ पासून सुरु केलेल्या पंतप्रधान मोदींच्या मन कि बातचा आज १०० वा एपिसोड होता. केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगाणे पहिली आणि एक्ली या मनकीबात साठी भाजपने ठीक ठिकाणी व्यवस्था केली होती अनेक ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या दरम्यान मन कि बात मधून जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान भावुक झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक…
एन सी बी ची रेड भाजप कार्यकर्त्या मुळे वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या ज्या क्रूझवार रेड टाकून शाहरुख खानच्या मुळासह ८ जणांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती ती रेड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या आरोपींना पकडुन नेणाऱ्या एन सी बी पथकात चक्क एक खाजगी गुप्तहेर आणि एक भाजप कार्यकर्ता होता असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब…
