तुम्ही बाळासाहेब ब्रँड होते!मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बांधून फटकारले
मुंबई/बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काही लोक म्हणत होते की त्यांच्याकडे ब्रँड आहे, पण आमच्या प्रसाद लाड आणि शशांक राव यांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, तुम्ही नाहीत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला, नरेंद्र मोदी हा जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. अमित साटम यांनी ब्राह्मोस मिसाईल सारखा विरोधकांवर हल्ला चढविला. आपल्याला कोणी आता थांबवू शकत नाही. मागच्या वेळी थोडक्याने वाचलो होतो, दोनच नगरसेवक कमी पडले होते. आपल्याला माहिती आहे की कमी पडल्यावर काय करायचे ते. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीच जिंकणार, महापौर महायुतीचाच असणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
गेल्या वेळी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी उद्धवजी यांची इच्छा होती. आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. आपण सगळ्यांना बोलवले, तेव्हा एक पाऊल मागे घेऊन त्यांना महापौर दिलं. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष सगळे तुम्ही घ्या. आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही, पण जर तुम्ही कुठे चुकला तर आम्ही अंकुश ठेऊ असं सांगितलं. पण २०१९ ची निवडणूक आली आणि मग मला गाणे गावे लागले ‘अछा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का’.
आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही.२०२२ ला आम्ही गनिमी कावा दाखविला आणि २०२४ ला आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आणले. काहीही झाले तरी, कोणी सोबत आले तरी आणि कोणी सोबत आले नाही तरी मुंबईत महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरे बंधूंवर टीका केली. ते म्हणाले की, साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही म्हणालो कशाला पक्षावर लढायचं. तर ते म्हणाले आमचा ब्रँड आहे. आमचे शंशाक राव आणि प्रसाद लाड, दरेकर यांनी या ब्रँडचा बँड वाजवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे, तुम्ही ब्रँड नाही.
आमच्याकडे अमित साटम सारखा सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला. नरेंद्र मोदी नावाचा जगातील सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे.असेही ते म्हणाले
