अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर आयकर विभागाचा छापा
मुंबई/बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या संकटात सापडली आहे. आज (गुरूवार, 18 डिसेंबर ) आयकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला आहे. शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नव्हे तर बेंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याचीही माहिती समोर आली आहे….
