पुणे: अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय आज होणार आहे.आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून या बैठकीतच विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवला जाणार आहे.अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे असे बहुसंख्य आमदारांचे मत असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे.त्याच उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात लोटला गेला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर काल बारामतीत अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ , धनंजय मुंडेदेखील हजर होते
विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी उद्या पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होण्याची शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली आहे. अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन आज करण्यात आलं. धार्मिक विधी सुरु आहेत. मृत्यूनंतर काही ठिकाणी ३ दिवस, तर काही ठिकाणी १० दिवसांचा दुखवटा असतो. त्यानंतरच कुटुंबीय घरातून बाहेर पडतात. ही बाब लक्षात घेता पुढील निर्णय होईल. याबद्दलचं चित्र तास-दोन तासात स्पष्ट होईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

