मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई महापौरपदाचा तिढा आता संपल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेचा महापौरपद कुणाला द्यायचं आणि स्थायी समितीसह इतर समित्यांवर कुणाची वर्णी लावायची यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये गुरुवारी रात्री उशीरा डिनर डिप्लोमसी पार पडली. त्यामध्ये मुंबई महापालिकेसंबंधी सर्व निर्णय झाल्याची माहिती आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटाची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी कोकण भवनमध्ये दोन्ही पक्षाचे नगरसेवक जाणार असल्याचीही माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात निर्माण झालेल्या पोकळीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहेणुक्ताच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेनं कौल दिला. पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत मुंबईच्या महापौरपदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शितल गंभीर, योगिता कोळी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार आहे.

