पुणे/राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.सदर विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण ३००० मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक ११च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर ८.४३ वाजता रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. व्हि एस आर वेंचर्स लिमिटेड लियर जेट ४५ विमानाचं अगदी लँडिंगच्या काही तास आधी नियंत्रण बिघडलं आणि विमानाचा भीषण अपघात झाला. विमानाचे तीन तुकडे झाले. बारामती येथील विमान अपघाताच्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, “आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पण आगीच्या मोठ्या ज्वाळांमुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. काही मिनिटांतच संपूर्ण विमानाची राख झाली.

